नाना पटोलेंचे मन रमेना!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

भाजपश्रेष्ठी दखल घेणार?

भाजपश्रेष्ठी दखल घेणार?
मुंबई - विदर्भातील खासदार नाना पटोले यांचे भाजपत मन रमेना झाले असल्यानेच पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पटोले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा दारुण पराभव करून जिंकले आहेत. यानंतर केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्‍यता वर्तवली जात होती. गेली तीन वर्षे पटोले यांनी संयम बाळगला. विदर्भातील भाजपचा एक चांगला चेहरा म्हणून पटोले यांना केंद्रात मंत्रिपद मिळणे योग्यच असल्याचे पटोले यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जाते. मात्र, त्यांना अद्याप मंत्रिपद लाभले नाही. लोकसभा निवडणूक लढवली नसती तर पटोले त्यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असते आणि राज्यात त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद निश्‍चित होते, असे सांगितले जाते. मात्र, यापैकी काहीच घडले नसल्यामुळे सध्या पटोले नाराज असल्याचे मानले जाते. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्यावर पटोले यांनी टीका केली आहे. या टीकेत जरी तथ्य असले तरी, मोदी यांची एकूण कार्यशैली पाहता ही बाब पटोले यांच्यासाठी पुढील काळात गंभीर ठरण्याची चिन्हे आहेत.