दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे मुंबईत निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मुंबई - 'लीडर', "हम हिंदुस्थानी' आदी चित्रपटांचे दिग्दर्शक राम मुखर्जी (वय 84) यांचे आज पहाटे निधन झाले. रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी इस्पितळात दाखल करण्यात आले; परंतु उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी कृष्णा, मलगा राजा, मुलगी व अभिनेत्री राणी मुखर्जी असा परिवार आहे.

त्यांनी 60 च्या दशकात बनवलेले "लीडर' आणि "हम हिंदुस्थानी' हे चित्रपट चांगलेच चर्चेत आले होते. मुखर्जी यांनी दिलीपकुमार, वैजयंती माला यांना घेऊन "लीडर' बनवला, तर राणी मुखर्जीला इंडस्ट्रीत ब्रेक देणारा "राजा की आयेगी बारात' हा चित्रपट ही त्यांची निर्मिती होती. फिल्मालय स्टुडियोजच्या संस्थापकांपैकी राम मुखर्जी हे एक होते. त्यांनी हिंदीतच नव्हे, तर बंगाली भाषेतही चित्रपटांची निर्मिती केली होती. राणी मुखर्जीचा पहिला बंगाली चित्रपट "बाईर फुल' याची निर्मितीही राम मुखर्जी यांनीच केली होती.