भ्रष्टाचाराच्या फाईल बंद करण्यासाठी अजित पवार मुख्यमंत्री भेट  - कदम

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जुलै 2017

मुंबई - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दिवसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात. मात्र, रात्री तेच उशिरा मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. महिन्याभरापूर्वी हेच अजित पवार मुख्यमंत्र्यांना रात्री एक वाजता भेटले. त्याची माहिती माझ्याकडे आहे. भ्रष्टाचाराच्या फाईल्स बंद करण्यासाठीच ते भेटले असावेत, असा गौप्यस्फोट पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला.

कल्याण-डोंबिवली येथे पक्षाच्या एका मेळाव्यात बोलत असताना अजित पवार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. कदम यांनी अजित पवार यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, 'अजित पवार दिवसा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडतात. त्याच मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री एक वाजता "वर्षा' बंगल्यावर जाऊन भेटतात. त्याची माहिती माझ्याकडे आहे. भ्रष्टाचाराच्या फाईल्स बंद करण्यासाठीच ते भेटले असावेत. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आणखी एक नेतादेखील होता.''