राष्ट्रपतिपदाबाबत शिवसेना नरमली

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 जून 2017

भाजपच्या नावावर विचार करण्याची तयारी
मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नावाचा आग्रह मागे घेऊन कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी पुढे केले असले तरी भाजपने अन्य नाव पुढे आणल्यास त्यावर विचार करण्याची तयारी शिवसेनेने दाखवली असल्याचे समजते.

शिवसेनेने विरोध केला तरी राष्ट्रपतिपदासाठी भाजपने पुढे केलेल्या व्यक्‍तीची निवड निश्‍चित असल्याने "व्हिप' नसलेल्या या निवडणुकीत वेगळी भूमिका का घ्यावी?, असे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे भाजपचे प्रयत्न आहेत. त्यातच महाराष्ट्रात शिवसेनेचे काही आमदार पक्षाच्या बैठकीला हजर रहात नसल्याने ते भाजपला ऐनवेळी मतदान करू शकतील, अशी भीती व्यक्‍त केली जाते आहे.

प्रतिभाताई पाटील राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार होत्या तेव्हा मराठी सन्मानाचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेने भाजपची साथ सोडली होती. आता तशी परिस्थिती नसल्याने शिवसेनेने सावध भूमिका घ्यावी, असा सांगावा भाजपने पाठवला असल्याचे समजते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या नावाचा विचार करण्यास हरकत नसल्याचे आज स्पष्ट केले आहे.