वायकरांविरोधात 'स्वाभिमान'चे आंदोलन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मुंबई - 4 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या मुंबई विद्यापीठातील कारभाराला जबाबदार धरीत उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या "सी-4' या निवासस्थानासमोर गुरुवारी सकाळी 10 वाजता आमदार नीतेश राणे यांच्या स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने धरणेआंदोलन केले.

"मुंबई विद्यापीठ परीक्षेत नापास मौनीबाबा रवींद्र वायकर राजीनामा द्या, आदित्य ठाकरे नौटंकी बंद करा' अशी जोरदार घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. आंदोलनाची पूर्वकल्पना मिळाल्याने पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. "स्वाभिमान'च्या कार्यकर्त्यांना एकत्र जमू न देता पांगविण्यात आले. तरीही कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करीत वायकर यांच्या राजीनाम्याच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून 30 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. स्वाभिमान विद्यार्थी संघटनेचे विक्रांत आचरेकर आणि रोहन देसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.