शिंदेंना "स्वच्छ भारत'चे ब्रॅंड ऍम्बेसिडर नेमा - सावंत

शिंदेंना "स्वच्छ भारत'चे ब्रॅंड ऍम्बेसिडर नेमा - सावंत

मुंबई - 'सोलापूर दौऱ्याच्या प्रवासात असताना जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे रस्त्याच्या कडेला लघुशंका करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या पार्श्‍वभूमीवर जागतिक शौचालय दिनालाच स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याचे राम शिंदे यांनी स्वतःच्या वर्तनाने दाखवून दिलेले आहे, अशी टीका करतानाच शिंदे यांना स्वच्छ भारत अभियानाचे ब्रॅंड ऍम्बेसिडर नेमण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

राज्यात सरकारकडून न केलेल्या विकासाची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू आहे. याअगोदरच नगरविकास विभागातर्फे झालेला विकास दाखवताना बॅंकॉकचे छायाचित्र दाखवणे, कळवण येथील घर, गॅस आणि वीज नसलेल्या ज्येष्ठ महिलेला शौचालय दिले असे दाखवणे, जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट नसलेल्या गावात जलयुक्त शिवारामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत असल्याची जाहिरात करणे, कॉंग्रेस सरकारच्या काळात राबविलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांना मिळालेला लाभ आता मिळाला, अशा तऱ्हेचे असत्याचे प्रयोग राजरोसपणे सरकार करत आहे. "मी लाभार्थी' या जाहिरातीत आता राम शिंदे यांचाही समावेश केला तर अधिक सयुक्तिक होईल, असे सावंत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com