सव्वा लाख गरोदर मातांना स्वाइन फ्लूच्या लसीचे कवच

सव्वा लाख गरोदर मातांना स्वाइन फ्लूच्या लसीचे कवच

मुंबई - राज्यातील सुमारे सव्वा लाख गरोदर महिलांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम पंधरा महिन्यांत राज्याच्या आरोग्य विभागाने यशस्वीरीत्या राबवली आहे. या मोहिमेमुळे या गरोदर माता आणि त्यांना होणारी अपत्ये यांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक लसीची कवचकुंडले लाभली आहेत.

महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध आणि नियंत्रण तांत्रिक समितीची बैठक 2015 मध्ये पार पडली. या बैठकीत इन्फ्ल्युएन्झा नियंत्रित ठेवण्यासाठी अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी इन्फ्ल्युएन्झा प्रतिबंधक लसीकरण ऐच्छिक आणि मोफत सुरू करण्याची शिफारस केली. याची अंमलबजावणी करताना आरोग्य विभागाच्या वतीने जुलै 2015 पासून राज्यभरात इन्फ्ल्युएन्झा प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. यासाठी तीन अतिजोखमीचे गट करण्यात आले. त्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांच्या लसीकरणासाठी एक स्वतंत्र गट तयार करण्यात आला. 2015-16 या वर्षभरात राज्यातील एकूण 1 लाख 1 हजार 356 अतिजोखमीच्या व्यक्तींचे लसीकरण आले. त्यात 90 हजार 220 एवढ्या गरोदर माता होत्या. यानंतर 17 ऑक्‍टोबर 2017 पर्यंत 34 हजार 424 अतिजोखमीच्या व्यक्‍तींचे लसीकरण झाले आहे. यात 30 हजार 941 हजार गरोदर मातांचा समावेश आहे. एकूण व्यक्तींच्या तुलनेत गरोदर मातांचे प्रमाण हे 89.88 टक्के इतके आहे.

- ऑक्‍टोबर 2017 पर्यंत - एकूण तपासलेले रुग्ण - 17 लाख 88 हजार 439
- त्यातील स्वाइन फ्लूची बाधा झालेले रुग्ण - 5913
- स्वाइन फ्लूने दगावलेले रुग्ण - 681
- स्वाइन फ्लूने दगावलेल्या गरोदर माता - 20


- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री
स्वाइन फ्लूने झालेल्या एकूण मृत्यूंच्या तुलनेत गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण हे निश्‍चितच कमी आहे. आरोग्य विभागाने राबविलेल्या उपाययोजना आणि इन्फ्ल्युएन्झा प्रतिबंधक लसीकरण मोहीम यामुळेच मृत्यूचा हा आकडा कमी ठेवणे शक्‍य झाले आहे. यात अजून सुधारणा होण्यासाठी शक्‍य ते सर्व प्रयत्न आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com