कोकणवासीयांना गणेशोत्सवात टोल माफ

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना टोलमुक्त आणि सुरक्षित प्रवास करता येईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आगामी गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट देणे व सुरक्षित वाहतूक व्यवस्थापनेबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले, की कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना 22, 23 आणि 24 ऑगस्ट रोजी आणि 1, 2, 3 आणि 4 सप्टेंबर रोजी पथकरातून सूट देण्यात येणार आहे. परिवहन आणि पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना पास आणि स्टिकर द्यावेत. सायन-पनवेल, खोपोली-पाली-वाकण रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत. गर्दीच्या वेळी जड वाहनांची वाहतूक बंद ठेवावी, क्रेन आणि रुग्णवाहिका सेवा तयार ठेवाव्यात, अशा सूचना संबंधितांना दिल्या.