पुन्हा एकदा 'कमल का फूल'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपला अनुकूल

मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपला अनुकूल
मुंबई - महानगरपालिकांच्या सत्तासंग्रामात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये "कॉंटे की टक्कर' होईल. येथे शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळणार असल्या तरीसुद्धा भाजप मात्र दुसऱ्या स्थानी राहील. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात कमळ फुलणार असून, ठाण्यामध्ये शिवसेनेची, तर नागपूरमध्ये भाजपची सत्ता येईल, असे "ऍक्‍सिस-इंडिया टुडे', "झी-24' तास या वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाची दिशा बदलण्यात आली असली तरीसुद्धा पक्षाची दशा बदलण्यात मात्र "राज'नितीला यश आलेले नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला नेहमीप्रमाणे यंदाही शहरांवर आपला ठसा उमटविता आलेला नाही.

मुंबई
शिवसेना... 86 ते 92
भाजप... 80 ते 88
कॉंग्रेस... 30 ते 34
मनसे..5 ते 7
राष्ट्रवादी कॉंग्रेस... 3 ते 6

ठाणे
भाजप...26-33
शिवसेना...62-70
कॉंग्रेस...2-6
राष्ट्रवादी कॉंग्रेस...29-34

नागपूर
भाजप... 98 ते 110
कॉंग्रेस... 35 ते 41
शिवसेना... 2 ते 4

पुणे
भाजप...77 ते 85
राष्ट्रवादी कॉंग्रेस...60 ते 66
शिवसेना...10 ते 13
मनसे...3 ते 6
अन्य...1 ते 3

'झी-24 तास'चा अंदाज
नागपूर
शिवसेना... 4 ते 6
भाजप..84 ते 87
कॉंग्रेस... 34 ते 36
राष्ट्रवादी कॉंग्रेस... 4 ते 6
मनसे...0 ते 2
अन्य... 22 ते 28

पुणे
शिवसेना... 12 ते 17
भाजप...55 ते 60
कॉंग्रेस...16 ते 21
राष्ट्रवादी कॉंग्रेस...55 ते 60
मनसे...6 ते 11
इतर... 5 ते 10

ठाणे
शिवसेना... 60 ते 65
भाजप... 20 ते 25
कॉंग्रेस... 3 ते 5
राष्ट्रवादी कॉंग्रेस... 28 ते 30
मनसे..2 ते 3
इतर... 5 ते 7

मुंबई
शिवसेना... 90 ते 96
भाजप... 78 ते 82
कॉंग्रेस...27 ते 30
राष्ट्रवादी कॉंग्रेस... 3 ते 5
मनसे..7 ते 9
इतर... 12 ते 17

सट्टा बाजार शिवसेनेच्या बाजूने
महापालिका निवडणुकीच्या निकालांबाबत राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विविध अंदाज व्यक्त होत असताना सट्टा बाजारही चांगलाच तापला आहे. मायानगरीत तब्बल 2 हजार कोटींचा सट्टा लागला असून, शिवसेना हीच बुकींची पहिली पसंती आहे. येथे शंभर जागांसाठी 0.34 पैसे हा दर जाहीर करण्यात आला आहे. भाजपने विजयाचा दावा केला असला तरीसुद्धा बुकींची पसंती मात्र शिवसेनाच असल्याचे दिसते. मुंबईत भाजपला केवळ 50 जागा मिळतील, असा त्यांचा अंदाज असून, भाजपसाठी 4.10 रुपये एवढा दर देऊ करण्यात आला आहे.