'मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी सरकार पडेल '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

नाशिक - "ऍट्रॉसिटी‘बाबत विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलवावे, अशी उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी, राज्यभर निघणारे मोर्चे यामागे राजकारण आहे. ही स्थिती पाहता, मुंबई महापालिका निवडणुकीअगोदर राज्य सरकार कोसळू शकते, असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलननिमित्ताने ते नाशिकमध्ये आले आहेत. ऍड. आंबेडकर म्हणाले, ""तीन महिन्यांपूर्वी कायद्यावर चर्चा झाली असून केंद्राने त्यात बदल केले आहेत. त्यामुळे कायद्यावर पुन्हा चर्चा होईल, असे वाटत नाही. कोपर्डी प्रकरणातील संशयितांना आंबेडकर विचारांच्या तरुणांनी पकडून दिले. संबंधितांचे आई-वडील बचाव करणार नाही, असे म्हणत असल्याची माहिती पोलिस देत आहेत. राजकीयदृष्ट्या "ऍट्रॉसिटी‘चा दुरुपयोग झाल्याचे आपण पाहिले आहे. सालगड्याला विरोधात वापरले गेले. म्हणूनच "ऍट्रॉसिटी‘मध्ये दलित व इतर लोकांचा सहभाग किती हे तपासायला हवे. यापुढील काळात कायद्यासाठी दलित मित्रांचा वापर करू नये.‘
 
शरद पवारांची भूमिका महत्त्वाची
ऍट्रॉसिटी कायदा रद्द करा असे कधीही म्हटलेले नाही, तर ऍट्रॉसिटीचा गैरवापर व्हायला नको, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली होती. पुरोगामी चळवळीचे नेतृत्व करणारे पवार कोपर्डीच्या घटनेनंतर काहीसे विचलित झाले होते. पण, यांनी स्वतःचे विचार जपणारी भूमिका मांडली असून ती माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे.