मराठा क्रांती मोर्चाचे शेवटचे टोक कुठे?

टीम ई सकाळ
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबईः मराठा क्रांती मोर्चात लाखो नागरिक सहभागी झाले आहेत. भायखळ्यातील राजमाता जिजामाता उद्यानापासून निघालेल्या या मोर्चाचे शेवटचे टोक नेमके कुठे आहे, याबाबत अद्याप माहिती पुढे आलेली नाही.

मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत. अनेकांनी सोमवारीच मुंबईकडे प्रस्थान ठेवले होते. आज (मंगळवार) पहाटेपासूनच महामार्गावरून शांततेत मोटारी मुंबईकडे रवाना होत होत्या. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी युवक, युवती, महिला व वृद्धांचाही मोठा सहभाग आहे.

मुंबईतील रस्त्यांवर भगवे वादळ पुढे-पुढे सरकताना दिसत आहे. परंतु, शेवटचे टोक नेमके कोठे आहे, याबाबत कोणीही सांगु शकले नाही. महामार्गावरही मोटारींच्या रांगा लागलेल्या आहेत. यामुळे या मोर्चामध्ये सहभागी झालेल्यांचा आकडा व शेवटचे टोक नेमके कोठे आहे, हे सांगणे आवघड आहे. मुंबईमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव ड्रोनला बंदी घालण्यात आली आहे. यामुळे मोर्चाचे चित्रीकरण करणे अवघड बनले आहे.

मराठा क्रांती मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाला असाल तर तुम्ही नेमके कोठे होता? याबाबत प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर लिहा. मराठा क्रांती मोर्चाचे शेवटचे टोक सांगणे अवघड असले तरी किमान अंदाज तरी येऊ शकेल...