'आप' लढविणार सर्व निवडणुका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई - 'आप' लढविणार सर्व निवडणुका आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याचे आम आदमी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते सुधीर सावंत यांनी जाहीर केले. पक्षसंघटना बळकटीसाठी पुढचा महिनाभर महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील आम आदमीचे म्हणजेच रयतेचे राज्य स्थापन करायचे असल्याचे सांगून सुधीर सावंत म्हणाले, की आम्हाला भाजप-शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना दूरच ठेवायचे आहे. कारण दोन्ही आघाड्या सारख्याच भ्रष्ट आहेत. जाती-धर्मावर आधारित राजकारणच त्यांना करायचे आहे. या दोघांनाही सक्षम पर्याय आम्हाला उभा करायचा आहे. महाराष्ट्रात त्यासाठी परिवर्तन आणायचे आहे.

Web Title: mumbai news aap party involve in all election