खरा मुस्लिम कधीही वंदे मातरम् म्हणणार नाही: अबू आझमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

...तर त्यांनी निघून जावे: रावते
वंदे मातरम बोलण्याबाबत सूरी ठेवायचा प्रश्न नाही. पण ज्यांना लाज वाटत असेल, तर त्यांनी स्वतःहून इथून निघून जावे ही आमची मातृभूमी आहे. वंदे मातरम या भूमीला स्वतंत्र करणारे गीत आहे. त्यांना याचा आदर करणे जड जात असेल, तर त्यांनी निघून जावे, असे शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सांगितले.

मुंबई - खरा मुस्लिम कधीही वंदे मातरम् बोलणार नाही, कारण इस्लाममध्ये अल्लाशिवाय इतर कोणालाही पूजता येत नाही, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे (सप) नेते अबू आझमी यांनी केले.

तमिळनाडूतील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये 'वंदे मातरम्‌' हे राष्ट्रगीत आठवड्यातून एकदा तरी म्हणणे बंधनकारक असल्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी जाहीर केला होता. के. वीरमणी यांनी यासंदर्भात केलेल्या याचिकेवर हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. याविषयी बोलताना समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी व एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी आपले मते व्यक्त केली आहेत.

अबू आझमी म्हणाले, की, खरा मुस्लिम नागरिक वंदे मातरम् कधीच बोलणार नाही. मी वंदे मातरम्चा मान ठेवतो, पण कधीही वंदे मातरम् गाणार नाही.

वारिस पठाण म्हणाले, ''मद्रास उच्च न्यायालयाने वंदे मातरम्ला बद्दल जो निर्णय दिला आहे. त्या संदर्भात आमचे म्हणणे आहे, की आम्ही संविधानला मानणारे आहोत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे आहोत. संविधानात कुठेही लिहिलेले नाही, की वंदे मातरम् बोलायला हवे. वारीस पठाण वंदे मातरम् नाही बोलणार. माझ्या गळ्यावर सुरी ठेवा किंवा डोक्यावर बंदूक ठेवा पण वंदे मातरम् नाही बोलणार.

...तर त्यांनी निघून जावे: रावते
वंदे मातरम् बोलण्याबाबत सूरी ठेवायचा प्रश्न नाही. पण ज्यांना लाज वाटत असेल, तर त्यांनी स्वतःहून इथून निघून जावे ही आमची मातृभूमी आहे. वंदे मातरम या भूमीला स्वतंत्र करणारे गीत आहे. त्यांना याचा आदर करणे जड जात असेल, तर त्यांनी निघून जावे, असे शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: