रांगेतील शेतकऱ्यांना लाठ्या का मारल्या जात आहेत?: अजित पवार

सोमवार, 31 जुलै 2017

विधानसभेच्या कामकाजला सुरवात होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियम 57 अन्वये स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. सर्व पक्षीय आमदारांनी पीकविम्याबाबत चर्चेची मागणी विधानसभेत केली.

मुंबई : देशाच्या प्रमुखांनी नोटबंदीवेळी सांगितले होते, की ही जीवनातील शेवटची रांग असेल, मग आता शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी रांगेत उभे का राहावे लागते ? दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रांगेतील शेतकऱ्यांना लाठ्या का मारल्या जात आहेत? हे मोगलाईचे सरकार आहे का?, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी विचारला. 

विधानसभेच्या कामकाजला सुरवात होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियम 57 अन्वये स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. सर्व पक्षीय आमदारांनी पीकविम्याबाबत चर्चेची मागणी विधानसभेत केली. या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. अजित पवार म्हणाले, की आम्ही परवा कर्जमाफीच्या चर्चेवेळी मूदत वाढ देण्याची मागणी केली होती. पीकविमा भरताना नांदेड जिल्ह्यातील शेतकरी रामा लक्ष्मण पोतरे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. 21 तासानंतर त्याचे पोस्टमार्टम झाले. त्या शेतकऱ्याचा काय दोष ? त्याचे वय 35 आहे. त्याचे कुटंबियाचे काय? त्या शेतकऱ्याच्या कुटूंबियाला दहा लाख रूपये मदत द्या.

यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील चर्चेची मागणी करताना म्हणाले, " शेतकऱ्यांच्या रांगा बँकेसमोर लागलेल्या आहेत. हा प्रश्न गंभिर आहे. पिक विम्याच्या अगोदर शेतकऱ्यांना स्वत:चा विमा उतरवावा लागेल. गेल्या वर्षी राज्यातील 1 कोटी दहा लाख शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. शेतकऱ्यांनी 3 हजार 947 कोटी रूपये विम्या पोटी भरले. व बाकीची रक्कम राज्य सरकारने व केंद्रांनी भरले. मात्र, एक हजार 729 कोटी विम्यापोटी मिळाले, म्हणजे कंपन्यांनी 2200 कोटी रूपये कमवले आहेत. शेतकऱ्यांची लुट झाली आहे. आता शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागत आहे. शेतकऱ्यांना कनेक्टिव्हीटीमुळे अडचण येत आहे. हे सरकारचे अपयश असल्याची टीका करत चर्चे मागणी केली. यावेळी सर्वच पक्षीय आमदारांनी चर्चेची मागणी केली.

सरकारनामावरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:
घुले बंधूनी मारले एका दगडात अनेक पक्षी
मुंबई बँकेविरोधात शिवसेना आमदारांची विधानभवानात निदर्शने​
बैलगाडा शर्यतीचे श्रेय : दोन पाटलांच्या वादात; महेश लांडगेंची "फळी फोड'
सुसाट भाजप, गोंधळलेली शिवसेना आणि भरकटलेले विरोधक​
मुख्यमंत्र्यांच्या गाड्या गेलेला रस्ता गोमूत्र आणि दुधाने धुतला​
भाजपच्या फुगलेल्या बेडकांना गडकरींनी बरे झाले टाचणी लावली!​
महाराष्ट्रात "खिचडी' अशक्‍य