आशिष शेलार आता 'टीम अमितभाई'त

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीला बोलावून घेतले आहे. शहा यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांनी संपूर्ण देशातील 25 महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी समिती तयार केली आहे. त्यात शेलार आहेत. दिल्लीत या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी व्हायचे असल्याने ते प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला गैरहजर राहिले.
Web Title: mumbai news ashish shelar in team amit shaha