सॅनिटरी नॅपकीनवर जीएसटी न लावण्याचा निर्णय; उपोषण मागे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

  • बचत गटातर्फे तयार करण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकीनवर जीसटी माफ करणार
  • 1 जुलैला जीआर काढण्याचे आश्वासन; अर्थमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई: महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकीनवर जीएसटी न लावण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितल्याने आझाद मैदानवर उपोषणासाठी बसलेल्या छाया काकडे यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.

मंत्रालयात मुनगंटीवर यांच्याशी आज (मंगळवार) मंत्रालयात झालेल्या बैठीनंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. कर्करुग्ण महिलांना सॅनिटरी नॅपकीन देणे, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयात सॅनिटरी पॅड वेंडिग मशिन बसविणे, रेशनिंगवरती सॅनिटरी नॅपकीन उपलब्द्ध करुन देणे या मागण्या मान्य करण्यात आल्याचे छाया काकाडे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 1 जुलैला या संदर्भात जीर काढण्याचे आश्वासन दिल्याचे काकडे म्हणाल्या. मान्य केलेल्या मागण्यांवर अंमलबजावणी न झाल्यास जंतरमंतरवर उपोषण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या मुद्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार असे छाया यांनी स्पष्ट केले.

21 जूनपासून छाया काकडे बचतगटांतर्फे तयार करण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकीनवर जीएसटी माफ करण्यासाठी उपोषणाला बसल्या होत्या.