बालगुन्हेगारांचे वय पंधरा?

मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 16 डिसेंबर 2017

मुंबई - बलात्कार करणाऱ्याचे वय पंधरा वर्षे असले तरी त्याला प्रौढ मानायला हवे, अशी शिफारस महाराष्ट्र सरकार केंद्राला करण्याच्या विचारात असून, त्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये गुन्हा करणाऱ्याचे वय मागील काही वर्षांत खाली आल्याच्या घटना महाराष्ट्रात आढळून आल्या आहेत. पंधरा वर्षांच्या मुलाची शाररिीरक वाढ पूर्णतः झाली असल्याने त्याला गुन्हेगार का ठरविण्यात येऊ नये, यावर तज्ज्ञांच्या समितीकडून मत मागविण्यात आले आहे. 

देश हादरविणाऱ्या दिल्लीतील ‘निर्भया’कांडात १६ वर्षांच्या मुलाचा समावेश होता. त्यानंतर हे वय १८वरून १६ करण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्राने ते १५ करणे आवश्‍यक असल्याची गरज व्यक्त केली आहे. यासंबंधात नेमलेल्या धर्माधिकारी समितीनेही गुन्हेगाराचे वय १५ असेल तर त्याला बालक मानू नये, अशी शिफारस केली आहे.

या संदर्भात आज ‘सकाळ’ला माहिती देताना गृह राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, की बालगुन्हेगारांचे वय; तसेच ते करत असलेल्या गुन्ह्यांची तीव्रता यांचा संबंध तपासून पाहावा, असे राज्य सरकारचे मत आहे. १५ वर्षांवरील मुले छेडछाड आणि बलात्काराच्या गुन्ह्यात गुंतली असल्याच्या घटना वाढल्या आहेत. या मुलांना तुरुंगाऐवजी बालसुधारगृहात टाकल्याने तेथील मुलांवर विपरित परिणाम होत असल्याची माहितीही पुढे आली आहे. तज्ज्ञ समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या विषयात अन्य राज्यांकडूनही माहिती मागविली जाईल.

मुंबईत लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना सुरक्षितता मिळावी यासाठी सर्व डब्यांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. रेल्वे सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची संख्या साडेतीन हजारांनी वाढवावी, असे निवेदन रेल्वे पोलिसांना दिले आहे. मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे रुळांच्या दुतर्फा भिंत घालण्याचे कामही युद्धस्तरावर हाती घेतले जाईल. महिलांवर राज्यात होणाऱ्या अत्याचारांची दररोज माहिती मिळावी यासाठी महानिरिक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. आदिवासी समाजात बालवयात होणाऱ्या लग्नांमुळे निर्धारित वयाआधी लग्न केलेल्या मुलांना गुन्हेगार म्हणून तुरुंगात डांबले जात असल्याची उदाहरणे आढळली आहेत. त्यासंदर्भात भंडारा जिल्ह्यात अभ्यासगट स्थापन केला जाईल.

Web Title: mumbai news Child Criminals age