कोंबिंग ऑपरेशनचा कॉंग्रेसकडून निषेध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू असून, अनेक तरुण, महिला, अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाचौकशी, रात्री अपरात्री घरात घुसून अटक करण्यात येत असल्याबद्दल कॉंग्रेसने निषेध केला आहे. 

कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी याबाबत पत्रक काढून सरकारच्या या कारवाईचा निषेध करत टीका केली आहे. सावंत यांनी म्हटले आहे, की आतापर्यंत विविध ठिकाणाहून दलित समाजाच्या हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हे झाले दाखल आहेत ते मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे हे मात्र मोकाट आहेत. मनुवादी विचारधारेच्या इशाऱ्यावर पोलिस कारवाई करत आहेत, अशी भावना दलित समाजात निर्माण झाली आहे. ही अन्यायी कारवाई तत्काळ थांबवावी.

Web Title: mumbai news congress Combing operation