भाजपच्या सामर्थ्यामध्ये अनुसूचित मोर्चाचा वाटा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

मुंबई - भारतीय जनता पक्ष राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला असून पक्षाच्या सामर्थ्यामध्ये अनुसूचित जाती मोर्चाचा वाटा महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विनोद सोनकर यांनी केले.

भाजप प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाच्या दोन दिवसांच्या अभ्यासवर्ग व प्रदेश कार्यसमिती बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते. या वेळी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अमर साबळे, खासदार डॉ. सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.

सोनकर म्हणाले की, भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने सामाजिक न्यायासाठी अनेक निर्णय घेतले असून महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. आपल्या सरकारच्या योजना समाजापर्यंत पोचविण्याचे काम अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे. तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत सरकारचे काम न्यावे व "अंत्योदया'चा विचार अंमलात आणावा.