आईवर महिन्यानंतर होणार अंत्यसंस्कार !

Kidney
Kidney

मुंबई - मूत्रपिंडदात्याच्या शोधात 2014 मध्ये भारतात आलेल्या इस्थर थेओफिलस (वय 23) हिचा नायजेरियाला मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई पोलिसांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून तिच्या व्हिसाची प्रक्रिया तत्काळ पूर्ण केली. त्यामुळे महिनाभरापूर्वी मृत्यू झालेल्या आईवर अंत्यसंस्कार करण्याकरिता लवकरच इस्थर नायजेरियाला रवाना होणार आहे.

फार्मासिस्ट असलेल्या इस्थरचे शिक्षण लंडनमध्ये झाले. तिची दोन्ही मूत्रपिंडे नीट काम करीत नसल्याचे चार वर्षांपूर्वी नायजेरियातील डॉक्‍टरांनी सांगितले. त्यामुळे मूत्रपिंड प्रत्यार्पणाचा निर्णय तिने घेतला. भारतात वैद्यकीय पर्यटन चांगले असल्यामुळे 2014 मध्ये वैद्यकीय व्हिसावर ती नवी दिल्लीत आली. पण तेथील महागड्या उपचारांमुळे तिच्या सोबतच्या व्यक्तींनी तिला मुंबईत उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ती मुंबईत येऊन किडनी प्रत्यार्पणासाठी दाता शोधत होती. यादरम्यान, मूत्रपिंड रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने इस्थरला मूत्रपिंड मिळणे कठीण झाले. प्रकृती खालावू लागल्याने तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

11 फेब्रुवारी 2018 ला तिला मोठा धक्का बसला. आईचा मृत्यू झाल्याची बातमी तिला समजली. त्यामुळे तत्काळ मायदेशी परतण्याशिवाय तिला पर्याय नव्हता. मात्र याच दरम्यान तिच्या व्हिसाची मुदत संपली होती. तिने मुंबई पोलिसांच्या फॉरेन रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये (एफआरआरओ) अर्ज केला. मानवतेच्या दृष्टिकोनातून या विभागाने तत्काळ कार्यवाही सुरू केली आणि मायदेशी परतण्याचा इस्थरचा मार्ग मोकळा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com