वैद्यकीय साहित्याचा गैरप्रकार टाळण्यासाठी पोर्टल 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई  - वैद्यकीय साहित्याच्या वापराबाबत होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य सरकार पोर्टल तयार करत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. 

मुंबई  - वैद्यकीय साहित्याच्या वापराबाबत होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य सरकार पोर्टल तयार करत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. 

विनापरवाना वैद्यकीय साहित्याचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांचा परवाना रद्द करण्याबाबतचा प्रश्न कॉंग्रेसचे सतेज पाटील यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना बापट यांनी सांगितले की, एकच उत्पादन पुन्हा वापरणाऱ्या 37 रुग्णालयांवर कारवाई केली आहे. वैद्यकीय उत्पादन कोणाला आणि कुठे विकले ही माहिती उत्पादकांना पोर्टलवर देणे अनिवार्य आहे. त्यामुळे या गैरप्रकारांवर नियंत्रण येईल, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला. एखाद्या रुग्णालयामध्ये एकच वैद्यकीय उपकरण वारंवार वापरले, असे आढळून आले तर त्या रुग्णालयाची चौकशी करून त्या उत्पादनाच्या बिलाची रक्कम संबंधित रुग्णाला रुग्णालयाकडून मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.