'इंदू सरकार' कोणालाही दाखवणार नाही!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई - माझ्या तोंडाला काळे फासण्याच्या धमक्‍या काही लोकांनी सोशल मीडियावरून दिल्या आहेत. त्यामुळे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या निर्णयावर भाष्य करणारा आगामी "इंदू सरकार' हा चित्रपट कोणालाही दाखवणार नाही, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी बुधवारी जाहीर केले.

कॉंग्रेसच्या नेत्यांसाठी या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग ठेवण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना लिहिले आहे. या चित्रपटातील काही पात्रांचे संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांच्याशी साधर्म्य असल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे; मात्र असे पत्र आलेले नाही, असे निहलानी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मी हा चित्रपट कोणालाही दाखवणार नाही, असे भांडारकर म्हणाले.