मुंबई - संविधान दिनानिमित्ताने डाव्या आणि समाजवादी पक्षांबरोबर अनेक संघटना रविवारी (ता. 26) संविधान जागर यात्रा काढणार आहेत. केवळ तिरंगा घेऊन कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होणार आहेत. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यामध्ये सहभागी होणार आहेत.
देवनार पांजरपोळ येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून दुपारी 12 वाजता ही यात्रा निघणार आहे. तिचा समारोप संध्याकाळी 7 वाजता दादर चौपाटीवरील चैत्यभूमीवर करण्यात येणार आहे. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार विद्याताई चव्हाण, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, प्रा. पुष्पाताई भावे, रामदास भटकळ आदी यात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
|