‘सकाळ माध्यम समूह’ करणार स्त्री-कर्तृत्वाचा गौरव!

Sakal-Women-Impact-Award
Sakal-Women-Impact-Award

मुंबई - आपल्यासमोरील आव्हानांवर लीलया मात करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवणाऱ्या महिलांचा गौरव ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने करण्यात येणार असून, त्यांना ‘सकाळ- वूमन इम्पॅक्‍ट अवॉर्ड’ देण्यात येणार आहे. कौटुंबिक, सामाजिक, औद्योगिक अशा वेगवेगळ्या सात क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांसाठी हा पुरस्कार असून त्यासाठीचे अर्ज २५ फेब्रुवारीपर्यंत ‘सकाळ’कडे जमा करणे आवश्‍यक आहे. अर्ज डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. 

आपल्यातील नेतृत्वगुणांची चमक दाखवून स्वत:बरोबर समाजाचाही विकास करण्याची धमक असणाऱ्या महिलांची निवड या पुरस्कारासाठी होणार आहे. यामध्ये कुटुंब आणि समाजाचे २१ व्या शतकातील प्रश्‍न सोडवण्यासाठी धडपडणारी माता ‘भारती पारितोषिका’ची मानकरी ठरेल. ‘शिक्षण पारितोषिका’ची मानकरी लोककल्याण; तसेच दारिद्र्यनिर्मूलनासाठी कार्यरत असलेली महिला ठरू शकेल. त्यासाठी तिने अर्थपूर्ण शिक्षण आणि कौशल्यवृद्धीसाठी केलेले योगदान विचारात घेतले जाईल. भू-वायू आणि जलप्रदूषण नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या महिलेसाठीही पुरस्कार असून त्यासाठी तिने प्रदूषण करू शकणाऱ्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा त्यांचा जबाबदारीने वापर व्हावा यासाठी प्रयत्न केलेले असायला हवेत. या पुरस्काराचे नावच ‘जबाबदार वापर पारितोषिक’ (रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अवॉर्ड) असे असणार आहे. याच धर्तीवर ‘जबाबदार उत्पादन पारितोषिक’ही (रिस्पॉन्सिबल प्रॉडक्‍शन अवॉर्ड) देण्यात येणार असून भू-वायू आणि जलप्रदूषण; तसेच घातक विषारी रसायनांचा संपर्क कमी करणाऱ्या सेवा उत्पादनांच्या निर्मितीसाठी केलेल्या उल्लेखनीय कामासाठी ते असेल.

सकाळ- वूमन इम्पॅक्‍ट अवॉर्ड #Sakal-Women Impact Award

समाजाला भेडसावणाऱ्या मुद्द्यांच्या निराकरणासाठी; तसेच विकासासाठी मोठ्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी केलेल्या नवोन्मेषी कामासाठी ‘नवोन्मेष किंवा स्टार्टअप पारितोषिक’ देण्यात येईल.

नवोन्मेषाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपचाही त्यासाठी विचार केला जाईल. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठीही खास पुरस्कार देण्यात येणार असून तो सुप्रशासन, स्मार्ट सिटी किंवा स्मार्ट व्हिलेज उभारण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी असेल. त्याचबरोबर पर्यावरणाची हानी न करता ‘स्वच्छ’ ऊर्जेची निर्मिती करण्यासाठीही विशेष पुरस्कार आहे. निर्मितीबरोबरच स्वच्छ ऊर्जेच्या प्रसारासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी हा पुरस्कार असेल. 

या वेगवेगळ्या सात विभागांसाठी हे पुरस्कार देण्यात येणार असून त्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. अर्ज डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. याबाबतची अधिक माहिती ‘सकाळ’च्या कार्यालयात मिळू शकेल.

पत्ता - सकाळ भवन, प्लॉट नं. ४२ बी, सेक्‍टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, पिन-४०० ६१४.  संपर्क : (०२२) २७५७२९६१, ६६८४३००० E mail - womenimpact@esakal.com 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com