मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी 20 दिवसांत आरोपपत्र 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मुंबई - भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यूप्रकरणी 20 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात शुक्रवारी दिली. 

मंजुळा शेट्येचा शवविच्छेदन अहवालही गुन्हे अन्वेषण शाखेने (क्राईम ब्रॅंच) न्यायालयात सादर केला. याशिवाय या मृत्यूप्रकरणी स्थापन केलेल्या स्वतंत्र चौकशी समितीचा अहवालही काही दिवसांत न्यायालयात सादर केला जाईल, असेही न्यायालयास सांगण्यात आले. 

मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी दाखल केली आहे. उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर तिची सुनावणी झाली. मंजुळा स्वच्छतागृहात असताना तेथे चक्कर येऊन पडली. तेथेच त्यांची शुद्ध हरपली, अशी माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली. मंजुळाच्या शरीरावर आढळलेल्या खुणाही पडल्यामुळे झाल्याचा दावा यापूर्वीच तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात केला आहे. 

या घटनेचा पंचनामा डॉ. विश्‍वेश गोटे यांनी केला असून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती गुन्हे विभागाच्या वतीने सरकारी वकिलांनी दिली. तुरुंग प्रशासन आणि गुन्हे विभागामार्फत सुरू असलेला तपास समाधानकारक असल्याची टिप्पणी करून याप्रकरणी पुढील अहवाल सादर करा, असा आदेश खंडपीठाने दिला आणि सुनावणी चार आठवडे तहकूब केली. 

Web Title: mumbai news Manjula Shetty case