राज्यभरातील मराठा बांधव ऐतिहासिक मोर्चासाठी मुंबईच्या वेशीवर...

संजय मिस्किन
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मुंबईः राजधानी मुंबईतला उद्याचा मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक होण्याची सर्व तयारी पुर्ण झाली असून, राज्यभरातील मराठा बांधव मुंबईच्या वेशीवर पोहचण्यास सुरूवात झाली आहे.

उद्याच्या या मोर्चासाठी मराठा संयोजक समिती, मराठा स्वयंसेवक, पोलिस व वाहतूक प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईत किमान पन्नास हजार वाहने पार्क होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तर, मोर्चामुळे दक्षिण मुंबईतल्या सर्व शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. दादर येथील शिवाजी मंदिर मध्ये मोर्चाच्या सर्वस्वी नियोजनाची वॉर रूममधून करडी नजर ठेवली जात आहे.

देशातला सर्वात मोठा मोर्चा होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा व सुविधांची महानगरपालिका व सरकारने सर्वस्वी काळजी घेतली आहे. सध्या सोलापूर मधून बाराशे वाहने मुंबईकडे रवाना झाली आहेत. तर, उस्मानाबाद, लातूरकडून खासगी वाहने व रेल्वेने मराठा समाजाचे जथ्थेच्या जथ्थे रवाना झाले आहेत. मुंबईत डबेवाल्यांनी या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने उद्याची डबे पोहचवण्याची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, नाशिक, बुलढाणा, अकोला, बीड, परभणी, लातूर व उस्मानाबाद हून सर्वाधिक मराठे मुंबईत दाखल होत आहेत.

आज रात्रीपर्यंत मुंबईत किमान लाखाहून अधिक मराठे दाखल होण्याची शक्याता आहे. माथाडी कामगारांची साठ हजारांची फौज उद्या सकाळी मोर्चाकडे एकीने दाखल होत आहे. मुंबईतल्या तेरणा, वसंतराव साठे महाविद्यालय, माथाडी कामगार भवन, एपीएमसी मार्केट येथे मोर्चेकर्यांसाठी सोय करण्यात आली आहे. तर, ठाण्याच्या मार्गावर जागोजागी पाणी व नाष्टा देण्यासाठी तंबू टाकण्यात आले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :