गणित हा विषय पर्यायी नको 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 जून 2017

मुंबई - गणित विषयाची भीती लक्षात घेऊन या विषयाला पर्याय म्हणून ठेवण्याबाबत उच्च न्यायालयाने केलेली विचारणा बहुतांश शिक्षणतज्ज्ञांना पचनी पडलेली नाही. गणित हा विषय किचकट असला तरीही गणित विषय हा पर्याय नको, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. 

मुंबई - गणित विषयाची भीती लक्षात घेऊन या विषयाला पर्याय म्हणून ठेवण्याबाबत उच्च न्यायालयाने केलेली विचारणा बहुतांश शिक्षणतज्ज्ञांना पचनी पडलेली नाही. गणित हा विषय किचकट असला तरीही गणित विषय हा पर्याय नको, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. 

दहावी इयत्तेत गणित विषयांत अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण मोठे असल्याने विद्यार्थ्यांची गळतीही सुरू असल्याविषयी मंगळवारी (ता. 20) उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. दहावीनंतर कला व व्यावसायिक शाखांत गणित विषयाचा समावेश नसल्याने दहावीतील विद्यार्थ्यांना गणिताच्या किटकिटीपासून दूर लोटण्यासाठी हा विषय पर्याय म्हणून ठेवला जावा, असेही उच्च न्यायालयाने एसएससी आणि एचएससी बोर्डाला सुचवले. याचा फायदा दहावीच्या निकालावरही होईल, अशीही आशा व्यक्त करण्यात आली. दहावीत गणित विषय पर्याय म्हणून दिल्यास विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान दुरावेल, अशी भीती शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 

दोन पातळ्या ठरवाव्यात 
दहावीपर्यंत गणित विषय महत्त्वाचा ठरतो. प्रमेय असो वा मोठी सूत्रे गणित विषयाचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांना करता येतो. गणिताचा अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणांतही फायदा होतो. शिवाय दैनंदिन व्यवहारातील गणिताची स्पष्टता या इयत्तेतील गणिताच्या अभ्यासक्रमामुळे खूप चांगली समजते. गणित विषयांपासून विद्यार्थ्यांना पर्याय म्हणून पाहण्याची संधी दिल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, त्याऐवजी गणिताची काठिण्य आणि सोपी अशा दोन पातळ्या केल्या जाव्यात, असेही कुलकर्णी यांनी सूचवले.