कोकणात गणपतीसाठी 2,216 जादा एसटी बस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

मुंबई - यंदा एसटी महामंडळ कोकणातील गणेशोत्सवासाठी दोन हजार 216 जादा बस सोडणार आहे. शनिवारपासून (ता. 22) या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा जास्त गाड्या सोडण्यात आल्याचा दावा महामंडळाने केला आहे. 

बसच्या ग्रुप बुकिंगला 15 जुलैपासून सुरवात झाली आहे. परतीच्या प्रवासासाठी ग्रुप बुकिंग 23 जुलैपासून सुरू होणार आहे. रेल्वेने यंदा मोठ्या प्रमाणात विशेष गाड्या सोडल्या आहेत. आता एसटीनेही जादा बसची सोय केल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव काळात एसटीची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी महामंडळाने विशेष उपाययोजनाही केल्या आहेत. गतवर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणात एसटीने 2010 जादा बस सोडल्या होत्या. तीन हजार 915 फेऱ्यांद्वारे दोन लाख 62 हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. 

प्रवाशांच्या सुविधेसाठी कोकणातील महामार्गांवर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मुंबई आणि उपनगरांतील एसटी बस स्थानके व बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी अहोरात्र कर्तव्यावर असतील. तसेच वाहनदुरुस्ती पथक ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.