उद्धव ठाकरे यांची अवस्था "गजनी'सारखी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

मुंबई- सत्तेत राहून विरोधकाची भूमिका घेणारे व सतत भूमिका बदलणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी व्यंगचित्रातून हल्लाबोल केला आहे. नीतेश यांनी या व्यंगचित्रात "गजनी' चित्रपटातील आमीर खानच्या व्यक्तिरेखेशी तुलना केली आहे. हे व्यंगचित्र त्यांनी ट्‌विट केले असून, या टीकेला शिवसेना कशी उत्तर देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राणे पिता-पुत्र सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वी कोकणातील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे नेते नारायण राणे एकत्र आले होते. तेव्हा दोघांनीही एकमेकांचे कौतुक केले होते. काही दिवस उलटत नाहीत तोच नीतेश यांनी व्यंगचित्रातून उद्धव यांच्यावर बोचरी टीका केल्याने पुन्हा राणे-शिवसेना कलगीतुरा रंगून वाद विकोपाला जाण्याची शक्‍यता आहे. नीतेश यांनी या व्यंगचित्रातून सत्तेत सहभागी असलेली शिवसेना शेतकरी कर्जमाफी, समृद्धी महामार्ग आदी विषयांवरून विरोधकाची भूमिका घेत आहे; मात्र या भूमिकेचे शिवसेनेला वारंवार विस्मरण होत असल्याकडे लक्ष वेधले आहे.