'नौदलाच्या अवमानाबद्दल गडकरींनी माफी मागावी'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 जानेवारी 2018

मुंबई  - "मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमीन देणार नाही. त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे, त्यांचे मुंबईत काय काम?' असे उद्दाम वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय नौदलाचा अवमान केला आहे. यामुळे त्यांनी नौदलाची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

सावंत म्हणाले, की मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमीन न देण्याची भाषा ही सत्तेच्या उन्मादातून येते. सत्तेची नशा भाजपच्या नेत्यांच्या डोक्‍यात गेली आहे, त्यामुळेच त्यांच्याकडून वारंवार अशी वक्तव्ये केली जात आहेत. मुंबईच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकणाऱ्या तरंगत्या हॉटेलसाठी नितीन गडकरी एवढे आग्रही का आहेत? गडकरींना या तरंगत्या हॉटेलात एवढा रस का आहे, याची चौकशी झाली पाहिजे. 

भाजपचा राष्ट्रवाद हा भोंगळ असून, तो खासगी व्यापाऱ्यांकरिता लागू होत नाही, असा टोला सावंत यांनी लगावला. कॉंग्रेस पक्षाला आणि भारताच्या सर्व नागरिकांना भारतीय नौदलाचा अभिमान आहे, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: mumbai news nitin gadkari navy sachin sawant