अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ पुन्हा सुरू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी तयार केलेल्या संकेतस्थळाविषयीच्या तक्रारींची दखल घेत बुधवारी संकेतस्थळाची तपासणी करण्यात आली. सकाळी काही तास संकेतस्थळ नावनोंदणीसाठी सुरू ठेवण्यात आले होते. 

मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी तयार केलेल्या संकेतस्थळाविषयीच्या तक्रारींची दखल घेत बुधवारी संकेतस्थळाची तपासणी करण्यात आली. सकाळी काही तास संकेतस्थळ नावनोंदणीसाठी सुरू ठेवण्यात आले होते. 

नोएडा येथील न्याफा कंपनीच्या तज्ज्ञांनी या संकेतस्थळाची पाहणी केली. विद्यार्थ्यांना नावनोंदणीत येणाऱ्या अडथळ्यांबाबत त्यांनी माहिती घेतली. हे काम नोएडातूनच करण्यात आले. आता संकेतस्थळ "हॅंग' होणार नाही, असे शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, काही तासांसाठी बुधवारी सकाळी संकेतस्थळावर विद्यार्थी नावनोंदणीसाठी प्रयत्न करत होते; परंतु नावनोंदणी झालीच नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली. 

टॅग्स