ओशो न्यास गैरव्यवहाराचा तपास गुन्हे शाखेकडे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

मुंबई - आचार्य रजनीश यांच्या पुण्यातील ओशो न्यासमधील कथित गैरव्यवहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे, अशी माहिती आज पुणे पोलिसांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. 

मुंबई - आचार्य रजनीश यांच्या पुण्यातील ओशो न्यासमधील कथित गैरव्यवहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे, अशी माहिती आज पुणे पोलिसांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. 

रजनीश यांचे मृत्युपत्र बनावट असल्याचा दावा करणारी याचिका त्यांचे अनुयायी योगेश ठक्कर यांनी न्यायालयात केली आहे. याचिकेवर आज न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करणार का? अशी विचारणा न्यायालयाने मागील सुनावणीला केली होती. याबाबत पुण्याच्या पोलिस उपायुक्तांनी खंडपीठाला आज पत्राद्वारे माहिती दिली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे, असे त्यात म्हटले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने चार आठवड्यांत याबाबत अहवाल दाखल करावा, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. ओशो यांच्या मृत्युपत्रावरील स्वाक्षरी बनावट असल्याचा दावा ठक्कर यांनी केला आहे. ओशो यांचा मृत्यू 1990 मध्ये झाला. त्याआधी त्यांनी मृत्युपत्र बनवले होते. सध्याच्या विश्‍वस्तांनी न्यासचा निधी व्यक्तिगत कंपन्यांमध्ये गुंतविला आहे, असा आरोप याचिकादाराने केला आहे. याबाबत चार वर्षांपूर्वी त्यांनी पुणे पोलिसांकडे फिर्याद नोंदविली होती.

Web Title: mumbai news Osho trust corrupt