पेट्रोल पंपचालकांचा संप अखेर मागे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

मुंबई - पेट्रोलियम कंपन्यांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर युनायटेड पेट्रोलियम फ्रंटने शुक्रवारी (ता. 13) होणारा देशव्यापी संप मागे घेतला आहे. अटी आणि शर्थींचा भंग करणाऱ्या दिल्लीतील दहा पंपचालकांची एजन्सी खंडित केल्यानंतर संघटनांनी संपातून माघार घेतली. 

कमिशन वाढीसह इतर मागण्यांसाठी पंपचालकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. शिवाय महिनाअखेर बेमुदत संपाचा इशाराही दिला होता. मात्र, संपाची घोषणा केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत तो मागे घेण्यास पेट्रोलियम कंपन्यांनी भाग पाडले. पंपचालकांनी संप मागे घ्यावा; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा पेट्रोलियम कंपन्यांनी दिला होता. एजन्सी खंडित करण्याची कारवाई करून सरकार पंपचालकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.