पावसाळी पर्यटनात 41 टक्के वाढ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

मुंबई - पर्यटनाच्या दृष्टीने पावसाळ्याचे चार महिने "स्लॅक सीझन' मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत पावसाळी पर्यटन वाढले आहे. पावसाळी पर्यटनात जवळपास 41 टक्के वाढ झाली आहे. देशभरात पावसाळी पर्यटन वाढताना दिसत असल्याचा निष्कर्ष "फ्लाईट सेंटर ट्रॅव्हल ग्रुप'ने काढला आहे. 

हिरवाकंच परिसर, शुभ्र धबधबे आणि निसर्गाचे लोभस रुपडे पावसाळ्यात अनुभवता येते. काही वर्षांपासून पावसाळी सहलींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून यंदा मॉन्सून पर्यटनासाठी राज्यांतर्गत पर्यटनातही 30 टक्के वाढ झाली आहे. त्यात हिमाचल प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, उत्तराखंड, केरळसोबतच महाराष्ट्रातील कोकणालाही सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे. पावसाळ्यात निसर्गाची मजा अनुभवणाऱ्यांमध्ये एकट्याने पर्यटन करणाऱ्यांची संख्याही 15 ते 20 टक्के आहे, असे निरीक्षण "फ्लाईट सेंटर ट्रॅव्हल ग्रुप' ने नोंदवले आहे. कोकणातील धबधबे, समुद्रकिनारा, भातशेती आणि निसर्गाची मजा लुटण्यासाठी इतर राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत.