आरोप झालेल्या मंत्र्यांचा राज्यपालांनी राजीनामा घ्यावा - निरुपम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई - सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष संजय निरुपम यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली. संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. 

संजय निरुपम म्हणाले की, शिक्षणक्षेत्राचा बोजवारा उडाला आहे. विनोद तावडे यांनी नैतिक जबादारी घेऊन स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे होता. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवून हा प्रश्न सुटणारा नाही. तेव्हा राज्यपालांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून तावडे यांचा राजीनामा घ्यावा. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनीही एसआरएमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीमध्ये हजारो कोटींचा गैरव्यवहार केलेला आहे. एमआयडीसीची जमीन बिल्डरला कवडीमोल भावाने दिल्याचा आरोप निरुपम यांनी केला.

Web Title: mumbai news sanjay nirupam C. Vidyasagar Rao