महिलांची तस्करी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र यावेः पंकजा मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 जुलै 2017

दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे मुंबईत मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

मुंबई : महिलांची वाढती तस्करी हा जगातील सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन ही तस्करी रोखण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे, असे मत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केले.

दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे मुंबईत मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

मुंबई : महिलांची वाढती तस्करी हा जगातील सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन ही तस्करी रोखण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे, असे मत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने जे. डब्ल्यू. मेरियट येथे आयोजित करण्यात आलेल्या महिलांची तस्करी या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (गुरुवार) झाले. त्यावेळी मुंडे बोलत होत्या. चित्रपट अभिनेते अक्षयकुमार, घाना देशाच्या सेकंड लेडी हज्जा समीरा बौमिया, आंतरराष्ट्रीय न्याय आयोगाचे सीईओ गॅरी ह्योगेन, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आदींसह या परिषदेला विविध देशातील महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

महिलांवर होणारे वाढते अत्याचार आणि तस्करी यावर परिषदेच्या माध्यमातून विविध देश एकत्र आल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, 'महिलांच्या समस्या जगभरात सारख्याच आहेत. त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी 124 देश एकत्रितपणे लढा देत आहेत, असे असले तरी तस्करी, सामुहिक बलात्कार, अत्याचार यावर कडक व ठोस उपाययोजना झाली पाहिजे. अत्याचार झालेल्या महिलांना समाज सहजासहजी स्विकारत नाही, त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाची समस्येवर देखील परिषदेच्या माध्यमातून उपाय योजले जावेत अशी अपेक्षा व्यक्त करून महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी चांगले काम करीत आहे.'

याप्रसंगी दिशा परिवर्तनाची पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेच्या निमित्ताने महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाची पाहणी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व पंकजा मुंडे यांनी केली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: