शिक्षकांना ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई - गणेशोत्सवानिमित्त शिक्षकांना ऑगस्टचा पगार लवकर देण्याच्या हालचाली शिक्षण विभागात सुरू आहेत.  शिक्षकांचा पगार गणेशोत्सवापूर्वी दिला जावा, असा प्रस्ताव दिल्याची माहिती शिक्षण विभागाचे अपर प्रधान सचिव नंदकुमार यांनी मंगळवारी दिली.

याबाबतची फाइल मंजुरीसाठी अर्थ विभागाकडे पाठवल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने अर्थ विभागाला दिला. शिक्षकांच्या याद्यांसह सर्व आवश्‍यक तपशील पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सरकारी अध्यादेश काढण्यात येईल, असेही नंदकुमार म्हणाले. शिक्षकांच्या पगाराबाबत यंदा शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटनांमध्ये वाद उद्‌भवल्याने शिक्षकांना खूश करण्यासाठी हा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केल्याचे सूत्रांनी सांगितले.