पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लवकरच धोरण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

मुंबई - धबधब्यांवर आणि समुद्रात जाणारे पर्यटक हा चिंतेचा विषय असल्याने धोक्‍याच्या जागी सुरक्षारक्षक नेमण्याचा सरकारचा प्रयत्न असतो; मात्र अशा ठिकाणचे मृत्यू टाळण्यासाठी धोरण तयार करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी गुरुवारी दिली.

जयंत पाटील यांच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. सागरी किनाऱ्यांवर नेमलेल्या सुरक्षारक्षकांच्या कक्षात सीसीटीव्ही बसवण्याबरोबर तेथे लाइफ जॅकेटही देण्यात येणार आहेत. मुंबईतील सात किनाऱ्यांवर सुरक्षारक्षक आहेत; मात्र पर्यटकांची गर्दी लक्षात घेता ही संख्या वाढवण्याचेही त्यांनी मान्य केले. 

Web Title: mumbai news Tourists security ranjeet patil