'ते' जाधव परभणीचे; तावडे यांचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

मुंबई : परभणीचे संघाचे कार्यकर्ते रमेश जाधव यांच्या वाढदिवसाचे पत्र केवळ नावातील साधर्म्यामुळे अनावधानाने रा. ग. जाधव यांना गेले. त्याबद्दल आपण दिलगीरी व्यक्त करत आहोत, असा खुलासा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी www.esakal.com कडे केला आहे.

मागील वर्षी निधन झालेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक रा. ग. जाधव यांच्या नावे तावडे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पत्र पाठवल्याचे वृत्त वेबसाईटवर प्रसिद्ध झाले आहे. 

त्यासंदर्भात तावडे यांनी हा खुलासा केला आहे. 

दिवंगत साहित्यिक रा. ग. जाधव यांना तावडेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुण्यातील साधना ट्रस्टच्या पत्यावर तावडे यांच्या विभागातर्फे हे पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रावर तावडे यांची सहीदेखील आहे.

तावडे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की वाढदिवस हा एक असा दिवस आहे, प्रत्येक वर्षी या दिवशी आपण आयुष्याकडे वळून पाहतो. आजतागायत झालेल्या घडामोडींची, सुखदुःखाच्या क्षणांची मनाशी उजळणी करतो. आपण कठोर परिश्रम करून आजवरचा प्रवास यशस्वी केलेला आहे. अनेकांसाठी आधारवड, काहींसाठी मार्गदर्शक तर काहींसाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहात. येणाऱ्या आयुष्यात आपल्याला स्वतःतील विविध पैलू उमगावेत आणि त्यातून उत्तुंग शिखरावर आपण पोहोचावेत ही मनोकामना आहे. हा वाढदिवस आपल्याला आनंददायी आणि प्रेरणादायी ठरो.

Web Title: mumbai news vinod tawde ramesh jadhav