'आयटी'तील महिलांच्या सुरक्षेसाठी समिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी) काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना आखण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली आहे, अशी माहिती बुधवारी सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

काही महिन्यांमध्ये "आयटी' क्षेत्रातील महिलांवरील हल्ल्यांत वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी राज्य सरकारला विचारणा केली होती. न्या. आर. एम. सावंत आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. गृह विभागाच्या वतीने याविषयी तयार करण्यात आलेला अहवाल न्यायालयात दाखल करण्यात आला. त्यानुसार ज्येष्ठ सनदी अधिकारी रश्‍मी शुक्‍ला यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपशील चार आठवड्यांत दाखल करण्याची तयारी सरकारी वकिलांनी दर्शवली. महिलांच्या सुरक्षेबाबत न्यायालयाने "स्यू मोटो' याचिका दाखल केली आहे. पुण्यात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेची कंपनीच्या सुरक्षारक्षकानेच हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.