अन्नप्रक्रिया ही जन चळवळ होऊ दया: केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर

अन्नप्रक्रिया ही जन चळवळ होऊ दया: केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर
अन्नप्रक्रिया ही जन चळवळ होऊ दया: केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर

मुंबईः भारत सरकारच्या अन्नप्रक्रिया उदयोग मंत्रालयातर्फे कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया (CII) यांच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे 3 ते 5 नोव्हेंबर 17 या कालावधीत वर्ल्ड फ़ूड इंडिया हां कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

वर्ल्ड फ़ूड इंडिया हे गुंतवणूकदार, उत्पादक, निर्माते, अन्न प्रक्रिया उद्योजक, धोरणकर्ते, जागतिक अन्नप्रक्रिया उद्योग अर्थ व्यवस्थेतील संस्था यांचे सर्वात मोठे संम्मेलन असणार आहे. स्थानिक आणि परदेशी कंपन्याना या अन्न प्रक्रिया क्षेत्रात सक्रीय गुंतवणूक आणि व्यापारांच्या संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी उपस्थित उद्योजक आणि गुंतवणूक दाराना आवाहन करताना 'अन्नप्रक्रिया ही जन चळवळ होऊ दया' असे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिम्रत कौर बादल म्हणाल्या.

“आपल्या शेतक-यांचे अन्न उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. परीनामी, त्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. हा मोठ्या प्रमाणावर होणारा अपव्यय टाळण्यावर भर देत शाश्वत अन्नप्रक्रिया  उद्योग क्षेत्राची उभारणी करण्याबाबत आपल्या शेत कऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्या बाबतीत एमओएफपीआय काम करत आहे. त्यांचे भविष्य संरक्षित करण्यासाठी आपले व पंतप्रधान नरेंद्र मोदी व एमओएफपीआय यांसह अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्याचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर सकारातमक परीणाम होईल. आणि देशातील नागरिकाना सुरक्षित आरोग्यदायी अन्न उपलब्ध होईल. शेतकरी, किरकोळ विक्रेते आणि प्रक्रिया उद्योग यांच्यातील  दरी भरून काढण्यासाठी परिणामकारक पायाभतू सुविधा उपलब्ध  करून देण्यासाठी गेली तीन वर्षे एमओएफपीआय प्रयत्नांची पराकाष्ट्ठा करत आहे. वर्ल्ड फूड इंडिया (WFI) हा कार्यक्रम परदेशी गुंतवणूकदारांसाठी एक व्यासपीठ व्हावे, त्याच प्रमाणे आपले भारतीय गुंतवणूकदार आणि लघु उद्योगाना विदेसी बाजार पठेत पोहोचण्याचे माध्यम होऊन तो लाभ त्यांना लाभ मिळावा, अशी आमची इच्छा आहे. अनेक परदेशी कंपन्यांना भारतातील अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतवणूक  करण्याची इच्छा आहे आपण त्यांना मदत करू. भारतीय कंपन्यांच्या सहाय्यने सहकार्यात त्यांना व्यवसाय करायचा आहे. आपण या संधीचा लाभ घेण्यासाठी आम्ही तुंम्हा सर्वाना आमंत्रित करीत आहोत.

शेतकऱयांना त्यांच्या मालाचा खरा भाव मिळेलः मुख्यमंत्री
उपस्थित उद्योजकाना संबोधित करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न प्रक्रिया योजना, किसान संपदा योजना बद्दल सांगितले की, MOFPI महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी रोड शो करीत आहेत हे फार चांगले असून, त्यात सहभागी होण्या करिता आम्ही उत्सुक आहोत. शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील शाश्वतेत गुणवत्ता सुधारणा आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार काम करेल. जेणे करुन शेतमालाचा अपव्यय कमी होईल आणि शेतकऱयांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळेल. किसान संपदा योजने मुळे 20 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या माध्यमातून 2019-20 पर्यंत 5,30,500 प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com