संदीप देशपांडेंसह संतोष धुरीला दिलासा, जामीन मंजूर

Sandeep Deshpande Bail
Sandeep Deshpande Baile sakal

मुंबई : मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande Case) आणि संतोष धुरी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिस त्यांना अटक करणार होते. पण, त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. आज न्यायालयाने दोघांचाही जामीन मंजूर केला आहे.

Sandeep Deshpande Bail
संदीप देशपांडे, धुरी यांच्या जामिनावर उद्या सुनावणी

मशिदीवरील भोंगे हटवा नाहीतर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यानुसार मनसैनिकांनी गेल्या ४ मे रोजी मुंबईच्या काही भागात मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मनसैनिकांनी धरपकड देखील केली होती. मुंबई पोलिस हनुमान चालिसा प्रकरणात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंच्या मागावर होते. त्यावेळी राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ निवासस्थानाबाहेर देखील तगडा पोलिस बंदोबस्त होता. संदीप देशपांडे राज ठाकरेंच्या भेटीला आले होते. शिवतिर्थवरून बाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यानंतर पोलिस त्यांना ताब्यात घेणार इतक्यात गाडीत बसून पळ काढला. त्यांची आणि पोलिसांची झटापट देखील झाली होती. यामध्ये एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाली होती. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संदीप देशपांडेंसह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी देशपांडेंना अटक होणार होती. पण, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबई पोलिस गुन्हे दाखल झाल्यानंतर देशपांडेंच्या शोधात होते. ते ज्या गाडीतून पळून गेले त्या गाडीच्या ड्रायव्हरला देखील अटक करण्यात आली होती. पण, देशपांडे बेपत्ता होते. त्यामुळे ते मुंबई पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यांच्या अटपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. सुनावणी पूर्ण होईपर्यंत देशपांडे कुठेही दिसले नाही. अखेर आज मुंबई सत्र न्यायालयाने संदीप देशपांडेंसह संतोष धुरीला जामीन मंजूर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com