महाराष्ट्राच्या राजकारणाने कुस बदलली

Voting Percentage in ZP and Municipal Corporation elections
Voting Percentage in ZP and Municipal Corporation elections

महाराष्ट्राचे शहरी आणि ग्रामीण राजकारण बदलले असल्याचे नुकत्याच झालेल्या दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणूक निकालानंतरच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप आणि शिवसेनेने निवडणूक झालेल्या सर्व महापालिकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साफ मागे टाकले आहे. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीनंतर झालेली काँग्रेसची घसरण थांबता थांबत नसल्याचेही मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यात मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये आणि जिल्हा परिषदांमध्ये एकूण मतांच्या भागीदारीत काँग्रेस थेट चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक किती अटीतटीने झाली, याचे प्रत्यंतर राज्य निवडणूक आयोगाने आज (सोमवार) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून येत आहे. भाजप आणि शिवसेनेला मिळालेल्या एकूण मतांमध्ये अवघा एक टक्क्यांचा फरक आहे. त्या फरकाने भाजप दुसऱया क्रमांकावर गेला आहे. अन्य नऊ महापालिकांमध्ये मात्र भाजपने जबरदस्त कामगिरी केल्याचे आकडेवारी सांगते. अन्य नऊ महापालिकांमध्ये मिळून भाजपने एकूण मतदानाच्या 35.36 टक्के मते घेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहरांमध्ये थेट तिसऱया आणि चौथ्या क्रमकांवार फेकली गेली आहे. विशेषतः मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुंबई महानगरात राष्ट्रवादीपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जास्त म्हणजे 7.88 टक्के मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीला अवघी 4.96 टक्के मते पदरात पडली आहेत. 

महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱया जिल्हा परिषदेतही भाजपने अव्वल क्रमांक घेतला आहे. तिथे 24.91 टक्के मतांसह भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, ग्रामीण राजकारणात भाजपला येत्या काळात काँग्रेसचे नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान राहणार असल्याचे आकडेवारी सांगते. जिल्हा परिषदांमध्ये भाजपखालोखाल राष्ट्रवादीला 22.25 टक्के मते मिळाली आहेत. 

मुंबई महापालिकेतील पक्षनिहाय मतेः 

पक्ष   मते टक्केवारी
शिवसेना 1446428 28.83%
भाजप 1400500 27.92%
काँग्रेस 829894 16.54%
मनसे 395047 7.88%
अपक्ष 283293 5.65%
राष्ट्रवादी 248566  4.96%
इतर पक्ष 127828  2.55%
एमआयएम 127740 2.55%
समाजवादी पक्ष 111291  2.22%
बसप 45796  0.91%
एकूण 5016383 100.00%

अन्य नऊ महापालिकांमधील पक्षनिहाय मतेः
 

पक्ष टक्केवारी मते
भाजप 35.36% 8117289
शिवसेना 18.13%  4161052
राष्ट्रवादी 14.88% 3417072
काँग्रेस 13.14% 3016832
अपक्ष 5.30%  1215720
मनसे 3.96% 909632
बसप 3.34% 767278
एमआयएम 1.96% 449373
इतर पक्ष 3.93% 902783
एकूण 100.00% 22957031

जिल्हा परिषदांमधील पक्षनिहाय मतेः (पक्ष, एकूण मते, टक्केवारी या क्रमाने)
 

पक्ष एकूण मते टक्केवारी
भाजप 6,376,054 24.91%
राष्ट्रवादी 5,693,694 22.25%
काँग्रेस 4,972,272 19.43%
शिवसेना 4,739,976 18.52%
अपक्ष व इतर पक्ष 38,12,974 14.89%

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com