EVM 'गैरव्यवहारा'विरोधात काँग्रेस न्यायालयात जाणार!

Congress
Congress

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजप 'नंबर एक'चा पक्ष ठरला आहे. पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये मतदानासाठी वापरलेली 'इव्हीएम' सदोष असल्याचा आरोप काही स्थानिक उमेदवारांनी केला होता. या इव्हीएमच्या गैरव्यवहाराच्या मुद्दयावरुन येत्या काळात काँग्रेस आक्रमक होण्याची शक्‍यता आहे.

सर्व जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांकडून मतमोजणी आणि इव्हीएमच्या तक्रारीसंदर्भातील अहवाल पक्षाकडून मागविण्यात आला आहे. हा अहवाल एकत्रित करुन न्यायालयात जाण्याचा काँग्रेसचा विचार आहे. 

नोटबंदीचा निर्णय, काळा पैसा देशात आणण्यात सरकारला आलेले अपयश यानंतरही गेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यानंतरही जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला भरभरुन मते मिळाली. मुंबईत तर भाजपच्या जागा थेट 31 वरुन 82 वर पोहोचल्या. एकीकडे भाजपला इतके घवघवीत यश मिळालेले असताना पुणे, मुंबई, नाशिकसह काही ठिकाणांहून इव्हीएम सदोष असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

पुण्यातील एका अपक्ष नगरसेवकाला एकही मत न मिळाल्याने आपले स्वतःचे आणि कुटंबियांची मते नेमकी कुठे गेली? असा प्रश्‍न त्याने आयोगाला विचारला आहे. अशाच तक्रारी अन्य ठिकाणीही आहेत. त्यामुळे या प्रक्रिेयेत काही गैरव्यवहार झाला का? असा प्रश्‍न काँग्रेसने उपस्थित केला आहे. आपल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणीचा विस्तृत अहवाला मागवून त्यानंतर राज्यभरातील इव्हीएमच्या घोटाळ्यांविरोधात एक अहवाल तयार करुन न्यायालयात धाव घेण्याचा काँग्रेसचा विचार आहे. 

इव्हीएम मशीन परदेशातून खरेदी केल्या जातात. त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करणे शक्‍य आहे. प्रत्यक्ष मतदानावेळी किंवा मतदान झाल्यावर सॉफ्टवेअरमध्ये बदल घडविले जाऊ शकतात. विविध ठिकाणांहून आलेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाचा आणखी तपास होणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यभरातून मागविलेल्या माहितीच्या आधारे न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. 
- डॉ. राजू वाघमारे, प्रवक्ता, काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com