कोपर्डी खटल्याचा आज अंतिम युक्तिवाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

नगर - कोपर्डी अत्याचार व खून खटल्याचा अंतिम युक्तिवाद उद्या (ता. 26) पासून सुरू होणार आहे. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सुमारे एक वर्ष खटल्याचे कामकाज चालले. विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर उद्या खटल्याच्या अंतिम युक्तिवादाला सुरवात होणार आहे. त्यासाठी राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहेत.