नगर - कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना फाशीचीच शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज केला. निकालासाठी 29 नोव्हेंबर ही तारीख ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 25, रा. कोपर्डी, ता. कर्जत), संतोष गोरख भवाळ (वय 30, मूळ रा. खांडवी, हल्ली कोपर्डी) व नितीन गोपीनाथ भैलुमे (वय 26, रा. कोपर्डी) असे दोषी ठरविलेल्या आरोपींची नावे आहेत. सरकार पक्ष व आरोपी संतोष भवाळ याच्या शिक्षेबाबत आज युक्तिवाद पूर्ण झाला. भवाळ याच्यातर्फे ऍड. बाळासाहेब खोपडे व ऍड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी बाजू मांडली. ऍड. निकम यांनी तिन्ही आरोपींना जास्तीत जास्त म्हणजे फाशीची शिक्षा देण्यासाठी गुन्ह्यातील 13 महत्त्वाची कारणे न्यायालयासमोर मांडली. आरोपींच्या शिक्षेबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या खटल्याच्या निकालासाठी न्यायालयाने 29 नोव्हेंबर ही तारीख ठेवण्याचा आदेश दिला.
पॉईंटर
- थंड डोक्याने नव्हे, गोठलेल्या रक्ताने गुन्हा केला!
- घरांना कुलपे, दुकानेही बंद
- डोंगराएवढ्या दु:खाचे ओझे..
|