कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींचे अपील फेटाळले

संपत देवगिरे
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

'या खटल्यातील आरोपींनी खटल्यात काहींची जबानी घ्यावी अशी मागणी केली होती. ती फेटाळली आहे. त्यामुळे आता लवकर निकाल लागेल.'
- ऍड उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील.

नाशिक : कोपर्डीतील सामुहिक अत्याचार व खून प्रकरणातील संशयीत आरोपींनी विशेष सरकारी वकिलांची साक्ष घेण्याविषयी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळली. त्यामुळे खटल्यातील कालापव्यय व अडथळे दूर झाले आहेत. आता या खटल्याचा लवकरच निकाल लागेल अशी अपेक्षा संबंधीतांनी व्यक्त केली आहे.

कोपर्डी (जि. नगर) येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार व खून प्रकरणाने सबंध राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. विशेषतः याबाबत मराठा समाजाने राज्यभर मूकमोर्चे काढल्याने शासन यंत्रणा हादरली. त्यावर विशेष न्यायालयात खटला चालवून वर्षभरात तो निकाली काढला जाईल. विशेष सरकारी वकील म्हणून ऍड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र यातील संशयीत पप्पू शिंदे व अन्य तीन आरोपींच्या वकिलांनी या खटल्याबाबत सातत्याने कालापव्यय करण्याचा प्रयत्न केला. त्याचा एक भाग म्हणून सरकारी वकिल ऍड निकम यांची साक्ष घेण्याची मागणी केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. त्यामुळे खटल्याच्या कामकाजाला वेग येईल. आज (ता.17) याबाबत आरोपींतर्फे बचाव पक्षाच्या साक्षीदाराची साक्ष घेतली जाईल. त्यानंतर येत्या काही दिवसांत अंतिम बाजू मांडल्यावर खटल्याचा निकाल अपेक्षित आहे.

'या खटल्यातील आरोपींनी खटल्यात काहींची जबानी घ्यावी अशी मागणी केली होती. ती फेटाळली आहे. त्यामुळे आता लवकर निकाल लागेल.'
- ऍड उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :