काँग्रेस, राष्ट्रवादीचा आज विधान भवनावर मोर्चा

काँग्रेस, राष्ट्रवादीचा आज विधान भवनावर मोर्चा

नागपूर - शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान आणि यवतमाळमधील विषारी कीटकनाशकांच्या बळींच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारला नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी (ता. १२) विधान भवनावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेकाप, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) या पक्षांचा एकत्रित मोर्चा धडकणार आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार मोर्चाचे नेतृत्व करतील. 

मंगळवारी सकाळी ११ वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते दीक्षाभूमीजवळ जमल्यावर मोर्चाला सुरवात होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते धनवटे कॉलेजजवळ एकत्र येऊन विधान भवनाच्या दिशेने मार्गस्थ होतील. दोन्ही पक्षांचे मोर्चे लोकमत चौकात येतील आणि तेथून एकत्रितपणे विधान भवनावर धडकतील. केंद्र आणि राज्य सरकार तीन वर्षांत सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. 

सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे नागरिकांत प्रचंड संताप आहे. त्याला वाचा फोडण्याचे काम या जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाद्वारे करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे या पक्षांच्या नेत्यांनी सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या विविध भागांतून येणारे नागरिक या मोर्चात सहभागी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com