शरद पवार गाडी थांबवून धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

शरद पवारांनी केली अपघातग्रस्तांची मदत
शरद पवारांनी केली अपघातग्रस्तांची मदत

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (बुधवार) विदर्भ दौऱयावर असताना रस्ते अपघातातील जखमींना मदत करून वस्तुपाठ घालून दिला. 

रस्त्यात झालेला अपघात पाहून पवार यांनी आवर्जून गाडी थांबवत अपघातग्रस्तांना मदत केली. पवार नागपूर विमानतळावरुन गडचिरोलीला जात असताना भिवापूर तालुक्यातजवळ टिपर आणि कारचा अपघात झाला होता. दौऱ्यातील कार्यक्रम नियोजित असताना अपघातातील जखमींना मदत करण्याला त्यांनी प्राधान्य दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

अपघातग्रस्तांना मदत करा असे शासन आणि प्रशासनाच्या वतीने सातत्याने करण्यात येते. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात सामान्य नागरिकांसमोर एक उदाहरण घालून दिले.

अपघाताचं दृश्य पाहून पवारांनी तेथे गाडी थांबविण्यास सांगितली, आणि ते स्वत: गाडीतून उतरून जखमींच्या मदतील धावून गेले. अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. तेव्हा स्वतः पवारांनी गाडीत अडकलेले काही तरुण, वृद्ध जखमींना बाहेर काढायला मदत केल्याचे उपस्थितांनी सांगितले. 

या कारमध्ये पाच वर्षाच्या मुलासह चारजण अडकले होते. या सर्वांना कारमधून बाहेर काढेपर्यंत पवार अपघातस्थळी थांबले. अपघातग्रस्तांना रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर पवार गडचिरोलीला रवाना झाले. 

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com