स्मार्ट सिटीच्या 11 प्रकल्पांचे डीपीआर प्रगतिपथावर 

स्मार्ट सिटीच्या 11 प्रकल्पांचे डीपीआर प्रगतिपथावर 

नागपूर - पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून एकूण 35 कामे प्रस्तावित आहेत. त्यापैकी चार कामे पूर्ण झाली असून, उर्वरित 31 कामांपैकी सात कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, तर चार कामांसाठीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच 11 प्रकल्पांचे डीपीआर प्रगतिपथावर आहेत; मात्र कंपनीला डिजिटल फलकाप्रीत्यर्थ कोणतेही शुल्क प्राप्त होत नाही. त्यामुळे डिजिटल फलकांसाठी महापालिकेला शुल्क देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. डिजिटल फलकांचा वापर व्यावसायिक जाहिरातीकरिता केला जाणार असेल, तर कंपनी पुणे महापालिकेला शुल्क देईल, असे लेखी उत्तर मुख्यमंत्र्यांनी तारांकित प्रश्‍नाबाबत दिले. 

आमदार विजय काळे यांनी विधिमंडळात पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून खासगी कंपन्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असल्याबाबत तारांकित प्रश्‍न मांडला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले. स्मार्ट सिटी योजनेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी केंद्र सरकारने 11 सल्लागारांच्या यादीतील मॅकेन्झी अँड कंपनी यांची अडीच कोटी रुपयांची निविदा महापालिकेकडून स्वीकारण्यात आली होती. त्यानुसार सेवा कराचे 36 लाख मिळून 2.86 कोटी 

रुपये अदा करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कंपनीकडून महापालिका क्षेत्रात उभारण्यात आलेले डिजिटल फलक नागरिकांसाठी रहदारीच्या सूचना, पर्यावरणविषयक आकडेवारी व अन्य समाजोपयोगी सूचनांसाठी वापरले जात आहेत. त्यावर व्यावसायिक जाहिरात केली जात नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com